नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील संशयिताचे घर महापालिकेकडून उध्वस्त

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी-राजेंद्र पवार

कुपवाड : चाणक्य चौक परिसरातील विघ्नहर्ता कॉलनी ये

थे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही आज मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला दुहेरी हत्याकांडाचे स्वरूप आले आहे.या प्रकरणातील संशयित आरोपी फरीद शेख याला पोलिसांनी अटक केली असून, आज महापालिका प्रशासनाने त्याच्या घरावर कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने घर उध्वस्त केले. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. किरकोळ वादाचे झाले दुहेरी हत्याकांडमिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या केसरेकर दाम्पत्य आणि संशयित आरोपी यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात झाले. संशयिताने मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर यांच्यावर कथितरित्या हातोडी व चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मोहन केसरेकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी झुंज देत असलेल्या मोहन केसरेकर यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

⭐हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र संताप

दाम्पत्याच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठा संताप व्यक्त करण्यात आला. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी एकत्र येत संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली.
हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. संशयित आरोपीचे घर बेकायदेशीर असल्यास त्याची महापालिका प्रशासनाने कायदेशीर तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिकेची कारवाई, मोठा पोलीस बंदोबस्त या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित घराची पाहणी व कायदेशीर बाबींच्या आधारे कारवाई केली. महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने संशयित फरीद शेख याचे घर उध्वस्त केले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.
घरावर कारवाई झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. मात्र, केवळ घर पाडण्याची कारवाई न करता मुख्य खटला जलदगतीने चालवून दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

⭐राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेटी

या घटनेनंतर विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. माजी आमदार नितीन शिंदे, शिवप्रतिष्ठानचे धारकरी राहुल बोळाज, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने, सनी धोत्रे आणि सदाशिव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार सुधीर गाडगीळ यांचा तीव्र निषेध
कुपवाड येथे घडलेल्या या अमानुष घटनेचा सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. मनीषाताई केसरेकर यांच्यानंतर त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना गमावण्याची ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.
केसरेकर दाम्पत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुपवाड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील पुढील पोलीस तपास आणि न्यायालयीन कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:29 am, August 23, 2026
26°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 21 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!