नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली आरटीओ कार्यालयात ट्रकचालकाची दादागिरी; महिला अधिकाऱ्याला आत्महत्येची धमकी

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी :- रमजान मुलानी

सांगली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) विना पीयूसी आणि थकीत करप्रकरणी कारवाई सुरू असताना ट्रकचालकाने शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रकवर चढून आरडाओरड करण्यासह महिला अधिकाऱ्याला आत्महत्येची धमकी देत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप असून, याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धू कृष्णा बागले (वय ४४, रा. नरसिंगगाव, ता. कवठेमहांकाळ) असे संबंधित ट्रकचालकाचे नाव आहे. मोटार वाहन निरीक्षक शितल सदाशिव काटे या ट्रकची तपासणी करीत असताना वाहनाकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्याचे तसेच वाहनाचा कर थकीत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार संबंधित वाहनावर नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, कारवाईला विरोध करत बागले यांनी ट्रकवर चढून आरडाओरड केली. तसेच महिला अधिकाऱ्याला धमकी देत अपमानास्पद वक्तव्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे आरटीओ कार्यालयातील शासकीय कामकाजात सुमारे पावणेदोन तास विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.
आरटीओ कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:33 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!