नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एलसीबीची धडाकेबाज कारवाई: ३०० किलो गांजासह कंटेनर ताब्यात

मिरज-पंढरपूर मार्गावर ३०० किलो गांजा जप्त; कंटेनरसह १ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
एकास अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – राजेंद्र पवार

सांगली, दि. २० ऑगस्ट २०२६ : मिरज-पंढरपूर मार्गावरील तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३०० किलो गांजा जप्त केला. गांजाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाला गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर सापळा रचून संशयित कंटेनर अडवला. कंटेनरची झडती घेतली असता ड्रायव्हरच्या केबिनमधील कप्यात १५० पाकिटांमध्ये गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजासह कंटेनर व मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयित मंगेश मोरे याला ताब्यात घेत अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक करीत असून, गांजा कुठून आणण्यात आला आणि तो कोणाला वितरित करण्यात येणार होता, याचा तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:03 pm, August 21, 2026
27°C
टूटे हुए बादल
71 %
20 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 71%
Visibility: 10 km
Sunrise: 6:11 am
Sunset: 6:56 pm
Translate »
error: Content is protected !!