नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

७/१२ उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी स्टॅम्प वेंडरवर गुन्हा दाखल; धुळे एसीबीची कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी संदीप अहिरे 

जळगाव/पाचोरा : शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंद कमी करून देण्यासाठी ८५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या स्टॅम्प वेंडरविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. समाधान सुभाष पाटील (वय ४०, रा. कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी स्टॅम्प वेंडरचे नाव आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:

तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे मौजे कुऱ्हाड खुर्द (ता. पाचोरा) येथे असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी कुऱ्हाड खुर्दचे तलाठी नकुल काळकर यांची भेट घेतली असता, त्यांनी ८०,००० रुपयांची लाच मागितली व ही रक्कम स्टॅम्प वेंडर समाधान पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने याबाबत ७ जुलै २०२६ रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली.

८५ हजारांवर तडजोड व एसीबीची पडताळणी:

एसीबीने पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत स्टॅम्प वेंडर समाधान पाटील याने सुरुवातीला ९०,००० रुपयांची मागणी केली व नंतर तडजोडीअंती ८५,००० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर ९ जुलै रोजी पुन्हा केलेल्या पडताळणीत, तलाठी काळकर यांनी तक्रारदाराला स्टॅम्प वेंडरला पैसे देण्यापासून न थांबवता हे काम तहसीलदारांच्या हातात असल्याचे सांगितले.

पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल व अटक:

१० जुलै रोजी तक्रारदाराच्या नातेवाईकाने या तक्रारीबाबत आरोपींना विचारणा केल्यामुळे आरोपीने स्वतः तक्रारदाराच्या घरी जाऊन काम करून देण्याचे आश्वासन दिल्याने प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नव्हती. मात्र, लाचेची मागणी सिद्ध झाल्याने अखेर २० ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी समाधान पाटील याला सायंकाळी ७:०६ वाजता अटक करण्यात आली.

कारवाई करणारे पथक:

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:34 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!