नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत मोबाईल चोरट्यांची टोळी जेरबंद; २ लाखांचे ९ मोबाईल हस्तगत

मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपी ताब्यात

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी : राजेंद्र पवार

मिरज :- मिरज शहरातील रमा उद्यान परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या झोपेचा फायदा घेत तब्बल नऊ मोबाईल हँडसेट चोरी करणाऱ्या टोळीचा मिरज शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे नऊ अँड्रॉइड मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.मिरज शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजाराम देदाराम (वय ३०, व्यवसाय मजुरी, रा. डुडीनगर, जोधपूर, राजस्थान; सध्या रा. रमा उद्यान, मिरज) हे सुतारकामाच्या व्यवसायानिमित्त आपल्या नऊ कामगारांसह रमा उद्यान येथील अग्रवाल बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते.
दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान सर्व कामगार शेडमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी शेडच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. झोपलेल्या कामगारांच्या उशाजवळ ठेवलेले तब्बल नऊ मोबाईल चोरून चोरटे पसार झाले. घटनेनंतर फिर्यादीने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच तपासी अंमलदार पोहेकॉ/३८० शिंदे व पोकॉ/२०३ स्वप्नील नायकोडे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान हा चोरीचा प्रकार पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आकाश ऊर्फ अक्षय जगन्नाथ फोंडे याने आपल्या साथीदारासोबत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी आकाश ऊर्फ अक्षय जगन्नाथ फोंडे (वय २१, रा. रमा उद्यान, म्हाडा कॉलनी, मिरज) आणि सतीश राजू शिंदे (वय १९, रा. रमा उद्यान, आंबेडकर नगर, म्हाडा कॉलनी, मिरज) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण नऊ अँड्रॉइड मोबाईल हँडसेट, अंदाजे किंमत दोन लाख रुपये, हस्तगत करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे मिरज शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून, जप्त मोबाईल अन्य कोणत्या गुन्ह्यांमध्ये वापरले गेले आहेत का, तसेच या आरोपींच्या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोउनि मसाळे, सपोफौ निलेश कदम, पोहेकॉ शिंदे, गवळी, मोरे, काझी, पोकॉ स्वप्नील नायकोडे, श्रीकांत केंगार, विटेकरी, पाटोळे, आसिफ सय्यद तसेच सायबर पोलीस ठाण्याचे करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे व विजय पाटणकर यांच्या पथकाने केली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:18 am, September 5, 2026
31°C
छितरे हुए बादल
50 %
23 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 28%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!