नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या सचिवपदी रवींद्र पाटील, तर सहसचिवपदी भाऊसाहेब जगताप यांची निवड

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला 

चाळीसगाव: सर्वोदय शिक्षण प्रसारक को-ऑप. समाज शिक्षण संस्थेच्या सचिव व सहसचिव पदासाठी मंगळवारी उंबरखेडे येथील मुख्य कार्यालयात विशेष सभा पार पडली. संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील व उपाध्यक्ष सुनीता राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत सचिवपदी रवींद्र चुडामण पाटील तर सहसचिवपदी भाऊसाहेब जगताप यांची बिनविरोध/एकमताने निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे १५ संचालक उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

​विशेष म्हणजे, रवींद्र पाटील यांचा मागील निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातून पराभव झाला होता. मात्र, यावेळी त्यांनी त्याच गटातून दणदणीत विजय मिळवत थेट सचिवपद पटकावले आहे. दुसरीकडे, सलग सहाव्यांदा संचालक म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब जगताप यांची सहसचिवपदी निवड झाली. त्यांच्या नावाची सूचना योगेश भोकरे यांनी मांडली.

​निवडीनंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित सचिव रवींद्र पाटील व सहसचिव भाऊसाहेब जगताप यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:57 am, September 5, 2026
24°C
छितरे हुए बादल
79 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 48%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!