सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई; ६ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
सांगली :- जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला आणि तब्बल ७ गुन्ह्यांमध्ये पाहिजे (परागंदा) असलेला रेकॉर्डवरील आरोपी अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. आरोपीकडून तब्बल ४०.१८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ६ लाख २ हजार ७६० रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले आहेत.
विशाल ऊर्फ मुक्या भिमराव पवार (वय ३५, रा. बहादुरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला २ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.आष्टा येथील घरफोडीच्या गुन्ह्यात होता हवा आष्टा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक १७८/२०२५, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ), ११२ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.दि. २७ जून २०२५ रोजी रात्री ११ ते २८ जून रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या दरम्यान हा गुन्हा घडला होता. याप्रकरणी संजय सुरेश वाडकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.एलसीबीच्या पथकाची गुप्त माहितीवर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.पोलिसांनी आरोपीकडून १९.९५९ ग्रॅम वजनाची सोन्याची नक्षीदार बांगडी (किंमत ₹२,९९,३८५) आणि २०.२२५ ग्रॅम वजनाची सोन्याची नक्षीदार बांगडी (किंमत ₹३,०३,३७५) असा एकूण ₹६,०२,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.एसपी तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परीट, अमोल पैदाळे, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, रोहन घरते, केरुबा चव्हाण, सुरज थोरात, विनायक सनदी, विजय पाटणकर तसेच सांगली सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.सात गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी पकडल्याने एलसीबीच्या या कारवाईचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.


