नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार येथे २२ ऑक्टोबरला ‘अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी जनआक्रोश महामोर्चा’

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी जयकुमार चित्ते 

नंदुरबार: सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी ‘अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी जनआक्रोश महामोर्चा संघर्ष समिती’ व सर्व आंबेडकरी समाजातर्फे गुरुवारी, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नंदुरबार शहरात विराट ‘जनआक्रोश महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

हा महामोर्चा गुरुवारी सकाळी १०:०० वाजता शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाराणा प्रताप पुतळा, बस स्टँड परिसरातून निघणार आहे.

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे समाजाच्या ऐक्याला तडे जाण्याची आणि हक्कांच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व समाजबांधवांनी, तरुणांनी, महिलांनी आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

“आपल्या घटनात्मक हक्कांच्या आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील बांधवांनी या महामोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी व्हावे,” अशी कडकडीची विनंती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर पोहोचवून मोर्चाची माहिती सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:36 am, October 8, 2026
26°C
साफ आकाश
51 %
6 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:23 am
Sunset: 6:13 pm
Translate »
error: Content is protected !!