🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार (विसरवाडी): नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील मो. सा. व ऍग्री हायस्कूलमध्ये घडलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा विसरवाडी पोलिसांनी यशस्वी तपास केला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच मुख्य आरोपीला जेरबंद करून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ आणि ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, अज्ञात चोरट्याने खांडबारा येथील मो. सा. व ऍग्री हायस्कूलच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. शाळेच्या कॉम्प्युटर रूममधून ३ कॉम्प्युटर स्क्रीन, ३ सीपीयू, ३ प्रिंटर आणि संबंधित केबल्स असा ऐंशी हजारांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला होता. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची धडक कारवाई
गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हालवली. गोपनीय खबऱ्यांची मदत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी राज उर्फ काळू मुकेश गोसावी या संशयित आरोपीला निष्पन्न केले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
कर्तबगार पोलीस पथkaची कामगिरी
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी जयेश दळवी, पोहई योगेश डिंगर, पोहवा संजय सुर्यवंशी, पोहवा हुमायून पटेल, पोलीस नाईक गिरीश वांगळे, पोशि प्रमोद शिंदे आणि पोलीस नाईक श्याम पेढावे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
विसरवाडी पोलिसांच्या या जलद आणि धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.



