नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शाहूपुरीत कॅश डिपॉझिट मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न तरुणावर गुन्हा दाखल.

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी- संजय दिंडे 

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरातील न्यू शाहूपुरी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोषागार शाखेअंतर्गत असलेल्या कॅश डिपॉझिट मशीनचे इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून आतील पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) पहाटे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुमान माणिक नायकवडी (वय २३, रा. शहाणेदिवाण गल्ली, बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
गुरुवारी पहाटे सुमारे २.१८ वाजण्याच्या सुमारास न्यू शाहूपुरी येथील एस. एस. कम्युनिकेशनजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोषागार शाखेअंतर्गत असलेल्या कॅश डिपॉझिट मशीनला लक्ष्य करण्यात आले. संबंधित मशीन काहीतरी साधन वापरून उचकटण्यात आले. तसेच आतील इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी संभाजी जगन्नाथ कुंभार (वय ४२, सध्या रा. बसंतबहार टॉकीजजवळ, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर; मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी २.३१ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ६२ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तसेच जप्त केलेला माल यांची नोंद निरंक असल्याचे पोलिसांच्या गुन्हा नोंद तपशिलात नमूद आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रेडेकर करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:32 am, October 17, 2026
26°C
घनघोर बादल
53 %
6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:26 am
Sunset: 6:05 pm
Translate »
error: Content is protected !!