नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक.


DPT News Network: धुळे:- हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व संभाजीनगर येथील सभेत जाहिर केल्याप्रमाणे दिनांक 4 मे रोजी मशिदी समोर दुप्पट आवाजाने भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख व त्यांचे सहकारी आज रोजी सकाळी शिवतीर्थ येथे जमले असताना त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करत शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे.
यावेळी मनसे जिल्हा सरचिटणीस संदीप जडी मनसे धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्त्री मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या पाटील , उपजिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, शहर उपाध्यक्ष प्रशांत तनेजा , राजेश दुसाने, विभाग अध्यक्ष योगेश वाणी, हरीश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटक केली यावेळी त्यांच्या सोबत हनुमान चालीसा वाजवण्यासाठी सोबत घेतलेला भोंगा देखील जप्त करण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा जोरदार घोषणा दिल्या व आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत सदर अटक ही हिंदूंचा आवाज दाबला जावा यासाठी असली तरी आम्ही हे सहन करणार नाही. अशा घोषणा देण्यात येत होत्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:41 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!