नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिंदखेडा तालुक्यात तीन शेतकर्‍यांवर हल्ला करणार्‍या बिबट्याचाही मृत्यू

प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील हतनूरमध्ये आज सकाळी शेतशिवारात काम करणार्‍या शेतकर्‍यांवर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. परंतू या घटनेनंतर हल्ला करणार्‍या बिबट्याचाही मृत्यू झाला. तोही त्याच ठिकाणी मृतावस्थेत मिळून आला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हतनुर गाव शिवारातील शेतात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकरी शेतात कामावर करीत होते. तेव्हा अचानक बिबट्याने वृध्द शेतकर्‍यावर हल्ला केला. त्यानंतरजवळील विलास पाटील आणि अमृत पाटील या दोघांवरही बिबट्याने हल्ला चढविला. तिघांनी मोठ्या जिवाच्या आकांताने आरडा-ओरड सुरू करीत बिबट्याला प्रतिकारही करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान शेतकर्‍यांवर हल्ला करणार्‍या बिबट्याही ठार झाला आहे. तो त्याच शेतात मृतावस्थेत मिळून आला. या घटनेमुळे विविध तर्कविर्तक लावले जात आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच धुळे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, शिंदखेड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल पवार, वनपाल नितीन सांगळे, प्रविण वाघ, नितीन मंडलीक आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:56 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!