DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर अध्यक्ष सुनील मैदिले मित्र परिवारातर्फे येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते केक कापून तो वितरित करण्यात आला. यावेळी फटाक्यांचे मोठे बार उडविण्यात आले. वाढदिवसानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ठाणेदार जयप्रकाश निर्मल, किशोर पारवे, अनिल देशमुख, अमर मोकाशी, रमेश भजभूजे, जयंत उमरेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. बस स्टॅन्ड परिसरात गोलू खापरीकर मित्र मंडळातर्फे मोठा केक कापून व महाप्रसाद वितरित करुन बाबा ताजुद्दीन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याशिवाय शहरातील आझाद चौक परिसरात जाकीर शेख तर तेलिपुरा परिसरात फिरोज पठाण मित्र मंडळींनी केक कापून वाढदिवस साजरा केला.



