नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एस.टी.महामंडळाने केलेली भाडेवाढ मागे घ्या अन्यथा‌ रास्ता रोको आंदोलन; प्रशासनाला निवेदन देऊन इशारा.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: साक्री तालुका शिवसेना (उबाठा) तर्फे तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना एस टी महामंडळाने केलेल्या भाडे वाढीच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमूद केले आहे की,अगोदर गोर गरीब जनता ही आधिकच्या महागाईमुळे त्रस्त झालेली आहे आणि त्यातच एस.टी महामंडळाने भाडे वाढ करुन जनतेची कंबरडे मोडण्याचाच हा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातच सत्ताधारी पक्षाने जी एस.टी.भाडे वाढ केलेली आहे त्यामुळे गोर गरीबी जनतेला फार मोठा फटका बसलेला आहे. तरी या बाबत आज महाराष्ट्र भर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एस.टी. डेपोत जिल्हा तालुक्यात चक्का जाम आंदोलने करण्यात येत आहेत. म्हणून आम्ही साक्री तालुक्यात शिवपुराण कथा चालू असल्या कारणाने महाराष्ट्राती लाखो भावीक हे शिवपुराण कथे साठी साक्री शहरात दाखल झालेले आहेत व त्यांचे येणे जाणे चालू आहे. म्हणून आम्ही चक्का जाम आंदोलन न करता जनतेला व प्रशासनाला सहकार्य करुन मा. तहसिलदार साहेबांना तालुक्याच्या वतीने सदरचे निवेदन देत आहोत तरी सदर शासनाने आठ दिवसात याची दखल घेतली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी. यावेळी धुळे जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ, तालुका प्रमुख चंद्रकांत सोनवणे, शहर प्रमुख हिम्मत सोनवणे,अमोल क्षिरसागर उपतालुका प्रमुख, युवा सेना तालुका समन्वयक केशव भाऊ शिंदे, मा.पं स. सदस्य बाळू शेठ टाटीया, तुषार भाऊ गवळी तालुका संघटक पिंपळनेर, रमेश शेवाळे उपतालुकाप्रमुख, जयप्रकाश भामरे ज्येष्ठ शिवसैनिक, पंजाबराव गांगुर्डे, तानुभाऊ कारंडे, विनोद शिंदे आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!