नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १ तासांत ठोकल्या बेड्या..

मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघड, अवघ्या १ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ आरोपी व विधी संघर्ष बालकास घेतले ताब्यात.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापूर:- दिनांक ११/०२/२०२५ रोजी १५.०० वा ते २१.३० वा चे दरम्यान सेनापती कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर येथील भोई गल्लीत राहणा-या श्रीमती सगुना तुकाराम जाधव वय ८० या वृध्द महिलेचा नातू गणेश चौगले रा. विक्रमनगर, इचलकरंजी व त्याचे दोन साथीदारांनी उसणे पैसे देत नसलेच्या कारणावरुन सगुना जाधव यांना कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून, तिचे डोके आपटून तिला ठार मारुन तिचे हातातील सोन्याच्या दोन पाटल्या व कानातील सोन्याची कर्णफुले काढून नेलेबाबत तिचा नातू सुशांत पुंडलिक जाधव वय ३१, रा. सेनापती कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुरगुड पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नंबर ३९/२०२५ बीएनएस १०३ (१), ३ (५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खुनाच्या गुन्हयाचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथके तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपले अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि चेतन मसुटगे व पोलीस उप निरीक्षक शेष मोरे यांची ०२ स्वतंत्र तपास पथके तयार केली होती.

नमुद तपास पथके आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने व प्रदिप पाटील यांना गुन्हयातील आरोपी गणेश चौगले हा बालाजी चौक, विक्रमनगर, इचलकरंजी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकांनी बालाजी चौक, विक्रमनगर येथे सापळा लावून आरोपी नामे गणेश राजाराम चौगले वय २८, रा. विक्रम नगर, गल्ली नंबर २, इचलकरंजी यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने काढलेले कर्ज फेडण्यासाठी विक्रमनगर येथील राहते घर विकलेले होते. तरीसुध्दा तो लोकांचे देणे लागत होता. आजी सगुना जाधव हिचे नावे बँकेमध्ये दोन लाख रुपये होते म्हणून त्याने आजीकडे एक लाख रुपये मागितले होते. परंतू आजीने पैसे देणेस नकार दिल्याने त्याने आपले मित्रांच्या मदतीने तिचा गळा आवळून खुन केला असलेचे सांगितले. त्यानंतर त्याचे मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडु करपे वय २५, रा. म्हसोबा गल्ली, विक्रमनगर, इचलकरंजी व विधी संघर्षग्रस्त बालकास इचलकरंजी शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी कडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकूण ४,००,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपी व वि.सं. बालकास गुन्हयाचे तपास कामी मुरगुड पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक राजीव शिंदे, पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने, प्रदिप पाटील, प्रशांत कांबळे, महेश खोत, रुपेश माने, राजू कांबळे, संदिप बेंद्रे, महादेव कुराडे, नामदेव यादव व सायबर पोलीस ठाणेचे पोसई अतिश म्हेत्रे व विनायक बाबर यांचे पथकाने केलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:59 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!