DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- दत्तात्रय पांचाळ
नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील उपजिल्हा असलेल्या देगलूर येथिल गरिबांच्या पाल्याची शाळा म्हणुन ओळखली जाणारी जिल्हा परिषद शाळा व पेठाअमरापुर शाळेविषयी स्वच्छतागृह,घाणीचे साम्राज्य, गुत्तेदारांनी केलेली ग्राउंड परिसरात केलेली गोडाऊन शाळेची दुरुस्ती ह्या केली होती तक्रार केली होती, याविषयी नांदेड जिल्ह्याचे (IAS) राहुल कर्डिले साहेब यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांना तात्काळ याविषयी शाळेची पाहणी करण्याचे निर्देश दिले असून नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांनी या विषयी दिरंगाई न करता तात्काळ याविषयी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य टिम देगलूरच्या जिल्हा परिषद शाळा व पेठाअमरापुर शाळेविषयी स्वच्छतागृह, घाणीचे साम्राज्य, गुत्तेदारांनी केलेली ग्राउंड परिसरात भरणा, यासर्व बाबीची तपासणी केली व मोडकळीस आलेल्या इमारतींना रेपेरिंगी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ह्या साठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अंदाजपत्रक तयार करून करुन देण्याबाबत सुचनाही दिल्या व संपूर्ण शाळेची पाहणी केली, यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता गंनगनठे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिंदे साहेब, गटशिक्षणाधिकारी कृष्णा तोटावार, जिल्हा परिषद शाळा व पेठाअमरापुर शाळेचे केंद्र अध्यक्ष भगवान पाटील झरीकर, जिल्हा परिषद शाळेचे बिरादार सर, पेठाअमरापुर शाळेचे बिरादार सर, ॲड पंकज कद्रेकर सर, किशोर तोटावार सर, लक्ष्मण पैडाकुलवार सर, यांच्या समवेत बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या समवेत तक्रारदार धनाजी जोशी आदींची उपस्थिती होती, तसेच या तक्रारी विषयी धनाजी जोशी यांना अनेकांचे धमक्या येत असुन सामाजिक कार्य करत असताना लोकहितासाठी असे धमक्या येत असतात त्यामुळे या धमक्या विषयी प्रशासनाला कळविले असुन जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे धनाजी जोशी यांनी सांगितले…



