वर्गातील मित्र-मैत्रिणींनी गेट-टुगेदर ठेवत केला नागरी सत्कार………
प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यातील आदर्श गाव शेवाळी गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने आनंदाने राहतात. एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करण्याची जणू या गावाची प्रथाच आहे. दरवर्षी या गावातील दहावी मधील वर्गमित्र मैत्रीनी एकत्र येऊन दिवाळी सणाच्या निमित्ताने गेट-टुगेदर साजरा करतात परंतु याला एक बॅच अपवाद होती जी यापूर्वी अशी एकत्र आलीच नव्हती यावेळेस एकत्र येण्याचे कारण आपल्या बॅचमधील वर्ग मैत्रीण स्वाती दिलीप जाधव ही जिद्दीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा पास करीत राज्य गुप्त वार्ता विभागात अधिकारी या पदावर तिची नियुक्ती झाली आहे. या नियुक्ती बद्दल गावात तिचा नागरी सत्कार करण्यात आला होता. या नियुक्तीमुळे संपूर्ण गावाला तिचा अभिमान आहे. पण त्यापेक्षा जास्त अभिमान तिच्या वर्गमित्र मैत्रिणींना झाला कारण आपल्या बॅच मधील मैत्रीण अधिकारी झाल्यामुळे सर्वांना गर्व वाटू लागला त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी सणाच्या निमित्ताने मुंबई पुणे नाशिक येथील वर्गमित्र गावावरती आले असल्यामुळे एकत्र येऊन तिचा सत्कार करून गेट-टुगेदर साजरा केला अशावेळी सर्वांनी वेळात वेळ काढून एकत्र आल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व त्यांनी निश्चय केला की आपणही इतर बॅच प्रमाणे दरवर्षी आपल्या गावावर गेट-टुगेदर साजरा करूया. या बॅचमधील कुणी शिक्षक, अधिकारी, पत्रकार, प्रगतिशील शेतकरी, कंपनी कर्मचारी, अशा पदावर आज काम करीत आहे, या वेळी शीतल साळुंके , प्रशांत नांद्रे , रमेश साळुंके, अकिल शहा, संदीप साळुंके , कांचन साळुंके , कविता पाटोळे, विद्या साळुंके, संतोष भदाने, फिरोज पिंजारी, सुनील ठाकरे, देवेंद्र साळुंके , संदीप साळुंके , विनोद साळुंके, सिमा नांद्रे, सुरेंद्र नेरकर, राकेश महाले,किरण साळुंके, भूषण साळुंके ,आदि उपस्थित होते.



