नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अखेर अपहरण युवकाचा खून, तिघे संशयित आरोपी अटकेत – चंदगड पोलिस तपासात निष्पन्न

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट

कोल्हापूर:- चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील १७ वर्षीय युवक हर्षद प्रकाश हुंडळेकर याचे अपहरण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह तिलारी नगरजवळील स्वप्नवेल दरीत फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये कीर्ती कुमार रामू कुठरे (वय २८), दिलीप लक्ष्मण कुठरे (वय २९) आणि श्रीनाथ मधुकर नागुडेकर (वय २४, सर्व रा. जंगमहट्टी, ता. चंदगड) यांचा समावेश आहे.हर्षद हुंडळेकर हा शनिवारी रात्रीपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. त्याचा शोध लागत नसल्याने त्याची आई योगिता प्रकाश हुंडळेकर यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीच्या माध्यमातून हर्षद प्रत्यक्ष भेटीपर्यंत पोहोचल्याची माहिती तपासात पुढे आली.
हर्षदचा शोध घेत असताना त्याचा खून करून मृतदेह तिलारी भागातील स्वप्नवेलजवळील दरीत टाकल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा शोध घेतला.
घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 294/2026, BNS कलम 137(2) अंतर्गत अपहरणाच्या गुन्ह्यात आज BNS कलम 140(1) व 3(5) ही कलमे वाढविण्यात आली आहेत. अपहरणाच्या घटनेमागे खून करण्याच्या उद्देशाने संगनमत असल्याच्या तपासाच्या अनुषंगाने ही कलमवाढ करण्यात आली आहे.नेमकी वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार असून API पोवार चंदगड पोलीस ठाणे हे पुढील तपास करीत आहेत.पुढील तपासात या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:57 am, September 5, 2026
24°C
छितरे हुए बादल
79 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 48%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!