नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एकता असंघटित संघटनेकडून स्वातंत्र्य दिन साजरा

“स्वातंत्र्य सेनानींचे बलिदान विसरता कामा नये” साहित्यीक -मिलिंद इंगळे

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

अकोला – मुर्तीजापुर येथे एकता असंघटित बांधकाम मजूर असोशियन मूर्तिजापूरच्या वतीने तसेच ग्रामीण पत्रकार संघ यांच्यामार्फत 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिन अति उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी त्यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि एका नव्या स्वतंत्र भारताचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
आपल्या देशाचे स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणार्‍या अशा असंख्य वीरांनी या भूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे,ते बलिदान विसरता कामा नये,आजच्या दिवशी आपण या सर्व देशभक्तांना आणि सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना कोटी कोटी प्रणाम करूया.
फक्त इंग्रजांना देशाबाहेर घालवणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, तर आपल्या देशाला समृद्ध करणे हे खरे स्वातंत्र्य आहे. आज आपला भारत तंत्रज्ञान, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. पण तरीही गरिबी, भ्रष्टाचार, प्रदूषण आणि अस्वच्छता यांसारख्या समस्यांना नष्ट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
एक जबाबदार नागरिक म्हणून, देशाच्या प्रगतीत छोटासा वाटा उचलणे हे आपले कर्तव्य आहे.
माजी सैनिक रजत प्रकाश गव्हांदे व ज्येष्ठ कवी रामकृष्ण आसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद इंगळे उपस्थित होते. माजी सैनिक रजत गव्हांदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गव्हांदे, ज्येष्ठ कवी रामकृष्ण आसरे, दिनेश भाऊ डोंगरदिवे संस्थापक अध्यक्ष एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन मुर्तिजापूर, गजानन तायडे तालुकाध्यक्ष जनग्रामिण पत्रकार संघ शाखा मुर्तिजापूर, प्रफुल्ल भटकर -जनग्रामिण पत्रकार संघ शाखा मुर्तिजापूर
सिध्दार्थ वानखडे -जिल्हा संघटक जन ग्रामिण पत्रकार संघ शाखा अकोला. पत्रकार नागोराव तायडे, पत्रकार रोहित सोळंके, श्रावणी रोकडे, पार्थ गवळी. उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:51 am, August 17, 2026
28°C
घनघोर बादल
65 %
21 Km/h
Wind Gust: 29 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!