🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी मिलिंद इंगळे
अकोला:- मूर्तिजापूर-येथील सुप्रसिद्ध कवी व ललित लेखक रवींद्र जवादे यांच्या’गाई गेल्या रानात’ या ललित लेखसंग्रहाचा सन २०२६-२७ पासून सुरू होणाऱ्या पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमातील MAR-6004- ‘ग्रामीण मराठी साहित्य:स्वरूप व संशोधन’ या पेपर अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. याबाबत त्यांना गोवा विद्यापीठाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. ग्रामीण जीवनातील स्पंदने नेमकेपणाने टिपणारा हा ललित लेखसंग्रह, विदयार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अधीक जवळून अभ्यास करताना, यातील लालित्याच्या आनंदाची एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास विदयापीठाने व्यक्त केला आहे.
‘गाई गेल्या राना’ या ललित लेख संग्रहात विस ललित लेख असून, या संग्रहाला महाराष्ट्रातील नामवंत संस्थांचे नऊ पुरस्कार मिळालेले आहेत. प्रतिष्ठित दिवाळी अंक व
पुरवण्यांमधुन संग्रहातील लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच रवींद्र जवादे यांची विविध साहित्य प्रकारातील तेरा पुस्तके प्रकाशित असून, विविध पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी चित्रपट कथा, शार्टफिल्म कथाही लिहीलेल्या आहेत. त्यांच्या या यशासाठी प्रसिद्ध कवी गणेश भाकरे यांनी नेहमी पाठबळ देऊन, मार्गदर्शन केले आहे. मूर्तिजापूर नगरीला हा साहित्य सन्मान प्रथमच मिळाल्याबद्दल, रवींद्र जवादे यांचे, त्यांचा मित्र परिवार, आप्तस्वकिय व
अक्षरक्रांती प्रतिष्ठान, सृजन साहित्य संघ, गझलदीप प्रतिष्ठान, कलाविष्कार बहु. संस्था, नेहरू युवा मंडळ, संस्कारभारती, ज्ञाननर्मदाबहु. संस्था, मूर्तिजापूर यांनी अभिनंदन केले आहे.



