नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जन रोड सेफ्टी फाउंडेशनचा नागपुरात विस्तार; अनेक मान्यवरांचा पदग्रहण व जाहीर प्रवेश!

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी सुनिल मैदिले 

नागपूर: रस्ता सुरक्षा आणि समाजहिताच्या जनजागृतीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जन रोड सेफ्टी फाउंडेशन भारत’च्या नागपूर शाखेत नुकताच मोठा संघटन प्रवेश सोहळा पार पडला. दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी फाउंडेशनमध्ये अधिकृत प्रवेश करत महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वीकारली.

हा प्रवेश सोहळा फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर शहर (जिल्हा) अध्यक्ष राजेश अधव यांच्या नेतृत्वात उत्साहात संपन्न झाला.

📌 नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी:

कार्यक्रमादरम्यान खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले:

उपाध्यक्ष: तोशिक राऊत, सुरज शेंडे, सुदर्शन मेश्राम, दिव्यशक्ती बोदेले

महासचिव: लखन पाटील, आदित्य शाहू

सचिव: बादल लांडगे

प्रमुख सदस्य: साईल हेंडवे, सर्वजीत चिमणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा फाउंडेशनमध्ये यशस्वी प्रवेश झाला.

🤝 रस्ता सुरक्षिततेचा घेतला ध्यास

या वेळी बोलताना उपस्थित सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नागपूर शहर तसेच संपूर्ण विदर्भात रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आणि अपघातमुक्तीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाठ व अध्यक्ष राजेश अधव यांनी सर्व नवंनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:12 am, October 22, 2026
32°C
घनघोर बादल
41 %
14 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 92%
Visibility: 10 km
Sunrise: 6:28 am
Sunset: 6:01 pm
Translate »
error: Content is protected !!