नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यव्यापी संपाचा इशारा.


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – कनोज शिकलगार इचलकरंजी

महाराष्ट्रातील सुमारे २५ लाख ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर संयुक्त रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी (पुणे) येथे झालेल्या राज्यव्यापी संयुक्त बैठकीत हा संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनधिकृत बाईक टॅक्सी, ऑनलाइन अॅप कंपन्यांची मनमानी आणि परिवहन विभागातील कथित आर्थिक पिळवणूक यामुळे रिक्षा व टॅक्सी चालक-मालक आर्थिक अडचणीत सापडल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.अनधिकृत बाईक टॅक्सीवर तातडीने बंदी घालून संबंधित अॅप कंपन्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करावी, ऑटोरिक्षा-टॅक्सी-कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून आवश्यक आर्थिक तरतूद करावी, ओला-उबरसह अन्य अॅप आधारित कंपन्यांचे भाडेदर व कार्यधोरण शासनाने निश्चित करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.याशिवाय एटीएस सेंटर, वाहन फिटनेस तपासणी व परवाना नूतनीकरण प्रक्रियेत चालकांची होणारी कथित आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच रिक्षा चालकांसाठी सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून द्यावेत आणि त्यांच्या प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.राज्यातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालक-
मालकांच्या रोजीरोटीशी संबंधित या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी संपादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, November 23, 2026
28°C
साफ आकाश
34 %
13 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:45 am
Sunset: 5:48 pm
Translate »
error: Content is protected !!