नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे ACB चा दणका: ४० हजारांची लाच घेताना PSI सह पोलीस शिपाई रंगेहाथ अटक

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी संदिप अहिरे 

धुळे: न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारणाऱ्या पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) पोलीस शिपायाला नाशिक व धुळे अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेले लोकसेवक:

​१. साईनाथ भानुदास तळेकर (वय ३६, पोलीस उपनिरीक्षक, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, धुळे)

२. अविनाश अरविंद सादरे (वय ३१, पोलीस शिपाई, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, धुळे)

नेमकी घटना काय?

​तक्रारदार (वय ३५ वर्षे) यांच्या सासऱ्यांच्या नावे मौजे वलवाडी (ता. जि. धुळे) येथे घर आहे. धुळे येथील एका दांपत्याने या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून सन २०१५ मध्ये एका फायनान्स कंपनीकडून परस्पर ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. या फसवणुकीप्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

​न्यायालयाच्या निर्देशानुसार, या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल कोर्टात पाठवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

अशी झाली कारवाई

​लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झाले.

​त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी सापळा रचून आरोपींना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही लोकसेवकांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

सापळा पथक व मार्गदर्शन:

​ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि श्रीम. कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील आणि मकरंद पाटील यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 am, August 7, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
24 Km/h
Wind Gust: 46 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:06 am
Sunset: 7:06 pm
Translate »
error: Content is protected !!