नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोन संशयितांना ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी

🚨DPT NEWS 🚨दर्शन पोलीस टाईम🚨

  • प्रतिनिधी : संजय दिंडे

कोल्हापुर :- शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला फुस लावून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा

धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून २०२६ रोजी दुपारी ०२:३० वाजेच्या सुमारास जनता बाजार परिसर, शाहूपुरी येथील माणिक चेंबर्सच्या

तळमजल्यावर असलेल्या ‘द पिझ्झा स्लाईस कॅफे’ मध्ये ही घटना घडली.संशयित आरोपी नदिम सादिक परांडे (वय १९, रा. माऊली पुतळा चौक, राजारामपूरी, कोल्हापूर) याने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिला आपल्या मोटरसायकलवरून कॅफेमध्ये नेले. तेथे तिची मर्जी नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच “याबाबत कोणाला किंवा घरी काही सांगितलेस तर तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही,” अशी गंभीर धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी राहुल वैभव कागले (वय २७, रा. १४९७ सी वॉर्ड, कोंडाओळ, लक्ष्मीपूरी, कोल्हापूर) याने सोबत असलेली मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी नदिम याला आपल्या कॅफेमधील जागा उपलब्ध करून दिली. आरोपीला गुन्हा करण्यास मदत व सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने कॅफे चालकालाही अटक करण्यात आली आहे.

शाहूपुरी पोलीस ठाणे (गुरं.नं. ५४९/२०२६)भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(१), ३५१(२) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) २०१२ चे कलम ४(२), १७.फिर्याद पीडित मुलीचे वडील यांनी दिली असून पोलीस पथकाची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा शेळके,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर तसेच पोलीस अंमलदार प्रशांत आवळे, रत्नदीप जाधव व संध्या सासणे यांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहा.पोलीस निरीक्षक सीमा शेळके करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:04 pm, September 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
54 %
10 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 64%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!