नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार एलसीबीची धडक कारवाई; आंतरराज्यीय बाईक चोर टोळी गजाआड, ३२ दुचाकींसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त!

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार -: नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ३० लाख ३० हजार रुपये किमतीच्या एकूण ३२ दुचाकी जप्त केल्या असून, नंदुरबारसह नाशिक जिल्हा, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील एकूण १९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या बैठकीनंतर तपासाला गती

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीच्या पद्धती, गुन्ह्यांची ठिकाणे, वारंवार चोरी होणारी वेळ आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती.

चिखली फाट्याजवळ पोलिसांनी रचला सापळा

२६ जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन संशयित इसम म्हसावद गावातील चिखली फाटा येथे चोरीची काळी स्पलेंडर मोटार सायकल विकण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ चिखली फाटा येथे सापळा रचला आणि संशयित दुचाकीस्वारांना थांबवून ताब्यात घेतले.

तीन आरोपींना अटक

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) बलवान ऊर्फ अजय ज्ञानेश्वर खडे (वय २९, रा. अंबापूर, ता. शहादा, जि. नंदुरबार)

२) हिम्मतसिंग सत्तरसिंग पावरा (वय २९, रा. पावरा कॉलनी, म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार)

३) रिजवान दगडू तेली (वय २९, रा. कुबेर नगर, म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार)

अशी झाली गुन्ह्यांची उकल

सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदरची मोटार सायकल साथीदार रिजवान तेली याच्या मदतीने खेडकोचरा माता मंदिर येथून सुमारे दोन महिन्यांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. ही बाईक धडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी रिजवान तेली यालाही ताब्यात घेतले.

आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी नंदुरबार, नाशिकसह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून मोटार सायकली चोरून त्या नातेवाईक आणि मित्रांकडे वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या सर्व ३२ दुचाकी हस्तगत केल्या.

चार राज्यातील १९ गुन्हे उघडकीस:

या कारवाईमुळे वेगवेगळ्या राज्यातील एकूण १९ गुन्हे उघडकीस आले असून, उर्वरित दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे.

नंदुरबार जिल्हा (०२ गुन्हे): म्हसावद शहर पो.स्टे. आणि उपनगर पोलीस प्रशासन.

नाशिक जिल्हा (०५ गुन्हे): देवळाली कॅम्प, सटाणा, जायखेडा (२ गुन्हे) आणि येवला शहर पोलीस ठाणे.

मध्यप्रदेश राज्य (०६ गुन्हे): राजोड, रतलाम, राऊ (इंदूर शहर), बदनावर (जि. धार), लसुडीया आणि सुजालपूर शहर पोलीस ठाणे.

गुजरात राज्य (०६ गुन्हे): दाहोद, व्यारा, वराछा, सरोली, दिंडोली आणि मंजुसर (जि. वडोदरा) पोलीस ठाणे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, विशाल नागरे, दिनेश चित्ते, सुनील येलवे, मोहन ढमढेरे तसेच पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, रामेश्वर चव्हाण, विनोद पाटील, आणि सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!