नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

व्हायरल स्टंटबाजाला पोलिसांचा दणका! सोशल मीडियावरील व्हिडिओ ठरला पुरावा

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार -: अक्कलकुवा तालुक्यात सार्वजनिक रस्त्यावर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर अक्कलकुवा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२६ जून २०२६ रोजी अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक रस्त्यावरील ईटवाई बसस्थानकाजवळ एका तरुणाने स्पोर्ट्स मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनेलवर व्हायरल झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, १८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे जिल्ह्यातील पोलीस पाटील गटांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान संबंधित युवक मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगदरीपाडा येथे आढळून आला.

चौकशीत त्याने आपले नाव जतिन गंगासिंग पाडवी, वय २२ वर्षे, रा. भगदरी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवर स्टंटबाजी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

दरम्यान, नंदुरबार जिल्हा पोलिसांनी सर्व युवक आणि नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारी कृत्ये टाळण्याचे आवाहन केले आहे.

यापुढे धोकादायक पद्धतीने वाहन चालविणारे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे आणि वाहनांच्या टपावर प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष मोहिमेद्वारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:58 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!