नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेडच्या खून प्रकरणातील फरार आरोपी दीड महिन्यानंतर जेरबंद; LCB चा गुरुजी चौकात छापा!

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 

प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड: नांदेड शहरातील बहुचर्चित खून प्रकरणातील मागील दीड महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गुरुजी चौक परिसरातून कौशल्याने सापळा रचून अटक केली आहे. मिर्झा शब्बर बेग मिर्झा गफार बेग (वय ४२, रा. खडकपुरा, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
दिनांक २१ जून २०२६ रोजी रात्री २:०५ वाजेच्या सुमारास बरकतपुरा-वाघी रोडवरील अबरार फंक्शन हॉलजवळ शेख शमीम शेख इसाक हे मित्रासोबत बसलेले असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. आरोपींनी गोळीबार करून तलवार व खंजीराने वार केले होते, ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेख शमीम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा (BNS १०३(१), ३(५) व शस्त्र कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दीड महिन्यांपासून बदलत होता ठिकाणे:
सदर गुन्ह्यातील आरोपी मिर्झा शब्बर बेग हा अटक टाळण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून सातत्याने आपली ठिकाणे बदलून राहत होता. नांदेड पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार फरार आरोपी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
३ ऑगस्ट २०२६ रोजी पोउपनि महेश कोरे व त्यांचे पथक गस्तीवर असताना, आरोपी मिर्झा शब्बर बेग हा गुरुजी चौक परिसरात आला असल्याची अचूक व गोपनीय माहिती पथकाला मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली धडक कारवाई:
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने व पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे, गोविंद खैरे, पोउपनि महेश कोरे, अंमलदार श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, महेश बडगु, सुधाकर देवकते तसेच खंडणी विरोधी पथक व सायबर सेलच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 am, August 7, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
24 Km/h
Wind Gust: 46 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:06 am
Sunset: 7:06 pm
Translate »
error: Content is protected !!