नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेळगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी शोधमोहीम कोल्हापूर–चंदगड रडारवर

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट 

कोल्हापूर, चंदगड :- संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ टोळी, आर्थिक व्यवहार आणि जुन्या वादांची चौकशी सुरू
बेळगाव : बेळगावातील युनियन जिमखाना क्लब परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या गंभीर घटनेने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापूर आणि चंदगड परिसरापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा तपास वेगाने सुरू असून संशयितांच्या शोधासाठी पोलिसांच्या विशेष पथकांकडून विविध ठिकाणी छापेमारी व चौकशी केली जात आहे.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांकडून बेळगावसह कोल्हापूर व चंदगड परिसरात संशयितांचा शोध घेतला जात आहे. गोळीबारामागील नेमका उद्देश काय होता, घटनेत सहभागी व्यक्तींचे परस्पर संबंध कोणते आहेत, तसेच यामागे कोणती टोळी सक्रिय आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.पोलिसांकडून हल्ल्यामागील आर्थिक व्यवहार, पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादांचे धागेदोरे तपासले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेला केवळ वैयक्तिक वादाचे स्वरूप आहे की त्यामागे मोठे नेटवर्क कार्यरत आहे, याबाबत तपास यंत्रणा विविध शक्यता पडताळून पाहत आहे.
दरम्यान, कॅम्प पोलिस ठाण्यात या घटनेशी संबंधित दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी एका गुन्ह्यात फिर्यादी सुरेश जालगार यांच्या तक्रारीवरून प्रफुल्ल पाटील व अन्य चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आदी गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली गुन्हा नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 am, August 7, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
24 Km/h
Wind Gust: 46 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:06 am
Sunset: 7:06 pm
Translate »
error: Content is protected !!