नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; २१ किलो गांजासह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना रंगेहाथ पकडले

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी हितेश शेठाने 

वर्धा: अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वर्ध्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान ८ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागपूर ते वर्धा रोडवर, नालवाडी ग्रामपंचायतीसमोर सापळा रचून एक मोठी कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या ‘किया सेल्टोस’ कारवर (क्र. एम.एच. ३२ ए.एच. ६९८६) एन.डी.पी.एस. कायद्यान्वये धाड टाकली. या कारवाईत गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करताना ४ आरोपींना घटनास्थळावरून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१) अमिर नसिब खा पठाण (वय ३० वर्षे, रा. इंदिरा झोपडपट्टी, आर्वी नाका, वर्धा)

२) सुरज राजु चव्हाण (वय २० वर्षे, रा. मनकापूर, अयोध्या, उ.प्र., सध्या मुक्काम: शिवनगर, वर्धा)

३) कल्याणी प्रकाश निकोसे (वय १८ वर्षे, रा. मनिष नगर, नागपूर)

४) उत्कर्षा ज्ञानेश्वर किरणाके (वय १९ वर्षे, रा. मनिष नगर, नागपूर)

महिना पगारावर ठेवून चालत होती तस्करी

पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेला गांजा हा मुख्य आरोपी अमिर पठाण आणि त्याचे साथीदार तौसिफ बेग व ‘छन्ना’ (टोपणनाव) यांच्या मालकीचा आहे. हे तिघे मिळून गांजा विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी सुरज चव्हाण, कल्याणी निकोसे आणि उत्कर्षा किरणाके हे अमिर पठाणकडे महिना पगारावर गांजाची वाहतूक करण्याचे काम करत होते. हा गांजा त्यांनी ओडिशा राज्यातील काटापंजी येथील ‘मदन सा’ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. हे सर्व आरोपी संगनमताने गांजाची तस्करी व विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

२२ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून २१ किलो ४८८ ग्रॅम गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली किया कार असा एकूण २२,३७,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ७ आरोपींविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई:

सदर धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (जि. वर्धा) चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सिनूकुमार बानोत, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, रवि पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अनूप कावळे, अभिषेक नाईक, विनोद कापसे, हर्षल सोनटक्के आणि स्मिता महाजन या पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:15 am, July 19, 2026
27°C
घनघोर बादल
66 %
9 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!