================================
भारतीय चित्रपटसृष्टीतील “डिस्को किंग”, “महागुरू” आणि करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा १६ जून रोजी ७६ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे. अभिनय, नृत्य, अॅक्शन, व्यक्तिमत्त्व आणि संघर्षाच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या मिथुन दा यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
दर्शन पोलीस टाईम्सचे इचलकरंजी प्रतिनिधी तथा पत्रकार निवास गागडे हे देखील मिथुन चक्रवर्ती यांचे बालपणापासूनचे निस्सीम चाहते आहेत. मिथुन दा यांची अभिनय शैली, दमदार फायटिंग, आकर्षक डान्सिंग, वेग वेगळ्या प्रकारची कपडे परिधान करण्याची शैली, केसांची फॅशन, उंच टाचांचे बूट घालण्याची स्टाईल, त्यांचा रुबाबदार लूक तसेच चालण्याची खास शैली यामुळे ते लहानपणापासूनच प्रभावित झाले आहेत.
पत्रकार निवास गागडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या किशोरवयात म्हणजे वयाच्या १६ ते १७ व्या वर्षी मी माझ्या मित्रासोबत दक्षिण भारत दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी तामिळनाडूमधील उटी येथील प्रसिद्ध मोनार्च फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी मला माझे आवडते अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अभिनेते मोहनीश बहल, त्यांच्या पत्नी तसेच अनेक नामवंत कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि अत्यंत आनंददायी अनुभव होता.”
ते पुढे म्हणाले की, “मिथुन दा यांचा संघर्ष, मेहनत आणि यशाचा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी गरीब कुटुंबातून येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर जागतिक स्तरावर नाव कमावले. त्यांचे व्यक्तिमत्त्व, साधेपणा आणि चाहत्यांवरील प्रेम मला नेहमीच भावते. आजही मी त्यांचे चित्रपट आवडीने पाहतो.”
मिथुन चक्रवर्ती यांनी ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’, ‘डान्स डान्स’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘अग्निपथ’, ‘गुरु’, ‘गोलमाल ३’, ‘द काश्मीर फाइल्स’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
मिथुन दा यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, जिद्द, मेहनत आणि यश यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यामुळेच ते आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करून आहेत.
🎂 महागुरू मिथुन चक्रवर्ती यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त पत्रकार निवास गागडे, त्यांचे मित्रपरिवार, कुटुंबीय तसेच सर्व चाहत्यांकडून त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
💐 “मिथुन दा यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने आपण पुढील अनेक वर्षे चाहत्यांचे मनोरंजन करत राहावे, हीच सदिच्छा.”
— निवास गागडे
पत्रकार, दर्शन पोलीस टाईम्स, इचलकरंजी



