नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शाहूपुरी पोलिसांची कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त.

DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी- संजय दिंडे कोल्हापूर

 

कोल्हापूर :- शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेत मोठी कारवाई करत तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.फिर्यादी कुशल हेमराज सामानी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांच्या मालकीची कावासाकी मोटारसायकल (एमएच 09 बी 1895) ही 18 जून 2026 रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची मोटारसायकल त्यांच्या घरासमोर उभी केल्याचे सांगितले. पोलिसांनी ती मोटारसायकल जप्त केली. पुढील चौकशीत त्यांनी आणखी दोन चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवल्याची माहिती दिली.या कारवाईत शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या इतर दोन गुन्ह्यांचाही उलगडा झाला. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये कावासाकी, बजाज एव्हेंजर आणि फॅशन मोटारसायकलींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे 1,10,000 रुपये आहे.पुढील तपास पोलिस अंमलदार परशराम येळूकर करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:41 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!