नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरची पूड फेकून लुटणाऱ्या टोळीला हरसुल पोलिसांकडून गजाआड; ३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी योगेश गवळे 

नाशिक : महिला बचत गटाची वसुली करून जाणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून भरदिवसा लुटणाऱ्या ३ अट्टल दरोडेखोरांना हरसुल पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) मदतीने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली महागडी स्पोर्ट्स बाईक, लुटलेली रोकड आणि मोबाईलसह एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

थरारक लूटमार आणि गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास ‘ए यु फायनॅन्स’ (नाशिक) कंपनीचा कर्मचारी नवनाथ चंदर मोरे (रा. राशेगाव, दिंडोरी) हा महिला बचत गटाचे जमा झालेले ८४,८८० रुपये आणि हिशोबाचा सॅमसंग टॅब बॅगेत घेऊन मोटरसायकलने चालला होता. पारधीपाडा ते लाडची गावाच्या दरम्यान निर्जन रस्त्यावर काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी मोरे यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. मोरे गाडीवरून खाली पडताच, आरोपींनी पैशांची बॅग हिसकावून विळवंडी गावाच्या दिशेने पोबारा केला.

याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९ (६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने आवळला आवळला पाश

पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने घटनास्थळाचा तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. पोलिसांनी सापळा रचून खालील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या:

१) योगेश लहानु फसाळे (वय २०, रा. लाडची, नाशिक)

२) जयराम महादु पारधी (वय २९, रा. पारधीपाडा, लाडची, नाशिक)

३) सोपान हरी पारधी (वय २२, रा. पारधीपाडा, लाडची, नाशिक)

न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कडक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत लुटलेला सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

रोख रक्कम: ₹८४,८८०/- (विविध मूल्यांच्या नोटा)

सॅमसंग टॅबलेट व बॅग: ₹४,०००/-

यामाहा आर-१५ (R15) स्पोर्ट्स बाईक: ₹२,१५,०००/- (क्र. MH 15 KX 7265, गुन्ह्यात वापरलेली)

स्मार्टफोन्स: ₹६०,०००/- (आरोपींचे मोटोरोला आणि विवो कंपनीचे ३ मोबाईल)

एकूण जप्त मुद्देमाल: ₹३,६३,८८०/-

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी (पेठ) वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासात हरसुल पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन बोरसे, पोसई सुनील आहेर, पोलीस हवालदार अनिल गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, प्रशांत काकड, पोलीस कॉन्स्टेबल भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, मयुर आव्हाड, धनंजय माळेकर, आनंद कोरडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संदीप नागपुरे व हेमंत गिलबिले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

🛑 नाशिक ग्रामीण पोलिसांचे आवाहन:

“सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी आपले सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावावेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल आणि एखादा गुन्हा घडल्यास गुन्हेगारांचा छडा लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे पोलिसांना सोपे होईल.” – नाशिक जिल्हा पोलीस दल

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!