नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सभासदांचा सत्कार समारंभ.

सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा.श्री.नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी अकिल शहा

साक्री:- दि.६ सप्टेंबर रविवारी रोजी म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल, डी.एस. राणे नगर निजामपूर ता.साक्री येथे गुणवंत विद्यार्थी व सभासदांचा सत्कार व समारंभाचा कार्यक्रम दुपारी ३ वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पुणे येथील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा.श्री. नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर व प्रेरणादायी जीवनपटावर विशेष व्याख्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी संस्थेचे धुळे जिल्हा उपनिबंधक मा. मनोज चौधरी उपस्थित राहणार असून तरी परिसरातील सर्व सभासद, पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व तसेच व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हसाई माता महिला बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:57 am, September 5, 2026
24°C
छितरे हुए बादल
79 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 48%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!