🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अकिल शहा
साक्री :- आधुनिक भारताचे अभियांत्रिकी पद्धतीचे शिल्पकार सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त शांतीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय इंजिनीयर दिवस म्हणजे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे (चेअरमन)अध्यक्ष अरुण.डी. नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेवाळी विज वितरण कंपनीचे (महावितरण) कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) हर्षल कमलासकर, प्रकाश अहिरे विद्युत तंतुचालक(वायरमन ) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला सुरूवात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून करण्यात आली.
MSEDCL Co. Ltd. यांच्या वतीने ज्युनिअर इंजिनिअर श्री.हर्षल कमलासकर यांच्या मार्गदर्शनाखाली व Green India या उपक्रमांद्वारे प्रशिक्षणार्थ्यांसाठी विशेष तांत्रिक प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षणादरम्यान स्मार्ट मीटर च्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर ची कार्यपद्धती, वापराचे फायदे-तोटे, वीज वापराचे अचूक मोजमाप आणि आवश्यक सुरक्षा खबरदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांचे तांत्रिक ज्ञान व व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीजतंत्री विभागाचे निदेशक आर.बी.कुवर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांतीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रोहित खैरनार, शांतीवन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य रोशन शेख, एचओडी करण पाडवी, यु.एस. सासले, श्रीमती कु.एच. साळुंके, भाऊसाहेब हतागळे, वाय.पी.मोहिते, विनोद निकम आदींनी परिश्रम घेतले



