नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेतीच्या वादातून पिस्तूलातून गोळीबार; 12 तासांत 5 आरोपी जेरबंद

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

पुणे:- शेतीच्या वादातून पिस्तूलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या पाच आरोपींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल व रिक्षा जप्त करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही या प्रकरणात समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मोई गावातील मुक्ताई मंदिराजवळ ही घटना घडली. फिर्यादी सुरेश विष्णू गावरी हे कुटुंबासह घरी असताना त्यांचा नातेवाईक आशीष नंदू गावरी आणि त्याच्यासोबत आलेल्या चार जणांनी वडिलोपार्जित शेतीच्या वादातून त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही व टाटा कारची दगडफेक करून तोडफोड केली.

यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत आशीष गावरी याने पिस्तूलातून सुरेश गावरी यांच्या दिशेने गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे व उत्तर महाळुंगे पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींना 12 तासांत अटक करण्यात यश आले.

अटक आरोपी

आनंद गौरव कांबळे (20)आशीष नंदू गावरी (21)अर्जुन बळीराम पाटे (27)

गणेश सोमनाथ पाटे (21)

तपासादरम्यान आरोपींनी महाळुंगे परिसरातील एका किराणा दुकानात पिस्तूलाचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेला आणखी एक गुन्हाही उघडकीस आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मोगले करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!