नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शाहूपुरी पोलिसांची मोठी कारवाई २८ हजारांच्या गांजासह ९५ हजारांचा मुद्देमालासह एक ताब्यात.

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- संजय दिंडे कोल्हापूर 

कोल्हापूर:- कोल्हापूर शहरातील शंभर फुटी रोड, कसबा बावडा परिसरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमाला शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीचा १ किलो ३४८ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक दिलीप माने (वय ३४, रा. ७८५/१ बी वॉर्ड, श्री हरी मंदीर शेजारी, रामानंद नगर, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोकॉ सचिन पांगे व पोकॉ रविकुमार आंबेकर यांना कसबा बावडा येथील शंभर फुटी रोडवर गांजा विक्री करण्यासाठी व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली.या आधारे पोलिसांनी ३० जून २०२६ रोजी दुपारी ४.५५ वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी सापळा रचला.

एकूण ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संशयित प्रतीक माने हा तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती केली असता २८,००० रुपये किमतीचा १ किलो ३४८ ग्रॅम वजनाचा ओलासर अमली पदार्थ (गांजा)५०,००० रुपये किमतीची हिरो पॅशन प्लस गाडी (क्र. MH-10-AL-2611) १७,००० रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी A31 मोबाईल.याप्रकरणी प्रशांत मार्तंड आवळे (पोलिस कॉन्सटेबल २५२८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम 8(C), 20(B)ii, (B) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर,पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, सनराज पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर, गौरव शिंदे, सचिन पांगे, प्रशांत आवळे व मंजर लाटकर यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:01 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
57 %
10 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 79%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!