महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेला शासनाचा सन्मान; १५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान
🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
मिरज प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज : महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी पोलीस सेवेत बजावलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीची शासनाने दखल घेत त्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
संदीप शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासनाकडून गौरव करण्यात येत असल्याने पोलीस विभागातही समाधानाचे वातावरण आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संदीप शिंदे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संदीप शिंदे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट पोलीस सेवेचा गौरव मानला जात आहे.



