नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्रीत पोलिसांची मोठी कारवाई: ७२.८८ लाखांचा बनावट दारू साठा व टाटा टर्बो जप्त, एक आरोपी जेरबंद

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी अकिल शहा 

साक्री :- मानवी जीवितास अत्यंत घातक असलेली बनावट विदेशी दारू रोखण्यासाठी धुळे पोलिसांनी राज्यभरात धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. याच मोहिमेअंतर्गत साक्री तालुक्यातील लघडवाळ येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि साक्री पोलिसांनी संयुक्त छापा टाकून ७२ लाख ८८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट दारूच्या अवैध अड्ड्यांवर शोधमोहीम राबवली जात आहे. दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लघडवाळ गावातील एका घरासमोर उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टाटा टर्बो वाहनात (MH-08/H-2109) बेकायदेशीर दारू लपवण्यात आली आहे. या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून छापा टाकला.

जप्त केलेला ऐवज

छाप्यादरम्यान पोलिसांनी आरोपी राकेश धनलाल भोये (वय २६, रा. धनकवडी, पारगाव, ता. साक्री) याला ताब्यात घेतले. वाहनाची पाहणी केली असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

  • बनावट दारू साठा: ‘Royal Blue Malt Whisky’ च्या १८० मि.ली. च्या काचेच्या बाटल्यांचे एकूण ६५५ खोके (एकूण ३१,४४० बाटल्या, किंमत रु. ६२,८८,०००/-).
  • वाहन: टाटा टर्बो चारचाकी (क्रमांक MH-08/H-2109, किंमत रु. १०,००,०००/-).
  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. ७२,८८,०००/-

गुन्हा दाखल

जप्त करण्यात आलेल्या बनावट दारूच्या बाटल्यांवर कोणताही बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग तारीख किंवा किंमत छापलेली नव्हती. मानवी जीवितास धोका निर्माण करणारा हा साठा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५०/२०२६ अन्वये BNS २७४, ३३६ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. ज्ञानेश्वर वारे, पोनि. दीपक वळवी, सपोनि. दीपक ढोके, पोउनि. अशोक वळवी व पोलीस अंमलदार तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राजीव गिते, सुशील शेंडे, संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील, दिनेश मावची, रोशन चित्ते, तुषार जाधव, विकास शिरसाठ आणि नारायण चव्हाण यांच्या पथकाने केली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

बनावट किंवा बेकायदेशीर दारूची निर्मिती आणि विक्री हा गंभीर अपराध आहे. नागरिकांना याबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ ११२ (Toll Free) किंवा धुळे पोलीस नियंत्रण कक्ष (०२५६२-२८८२११/२८८२१२) येथे संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव व संपर्क पूर्णपणे गोपनीय ठेवला जाईल.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:04 am, August 25, 2026
26°C
छितरे हुए बादल
75 %
15 Km/h
Wind Gust: 25 Km/h
Clouds: 47%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:53 pm
Translate »
error: Content is protected !!