नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री पंचायत समितीतील अभियंता व ठेकेदार २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

🚨DPT NEWS🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी अकिल शहा 

धुळे: शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या अनुदानाचा हप्ता मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि एका शासकीय ठेकेदाराला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. मनमोहन विजयसिंग राजपूत (वय ३०) आणि रोहन रोहिदास देवरे (वय ३१) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

घरकुलाचा हप्ता मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना साक्री तालुक्यातील जामदे येथे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. यापूर्वीच्या हप्त्यासाठी अभियंता मनमोहन राजपूत याने प्रति घरकुल ५ हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपयांची लाच घेतल्याचा तक्रारीत उल्लेख आहे.

उर्वरित अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी तक्रारदाराने १३ ऑगस्ट २०२६ रोजी साक्री पंचायत समिती कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभियंता राजपूत याने पुढील कार्यवाहीसाठी पुन्हा २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी धुळे ACB कडे तक्रार दाखल केली.

शेवाळी फाट्यावर ACBचा सापळा

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर साक्री शहरातील धुळे रोडवरील शेवाळी फाटा परिसरात सापळा रचण्यात आला.

अभियंता मनमोहन राजपूत याच्या सांगण्यावरून शासकीय ठेकेदार रोहन देवरे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ACB पथकाने दोघांना रंगेहात पकडले.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई

या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपींना ACBने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच यशवंत बोरसे, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, नितेश चौधरी आणि सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

लाचेची मागणी झाल्यास ACBशी संपर्क साधण्याचे आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ७७९८१६१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:28 am, August 23, 2026
26°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 21 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!