🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी राजेंद्र पवार
सांगली :- स्वस्त दरात चारचाकी, दुचाकी आणि सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर सलीम मुजावर व त्यांचे मित्र युसुफ इसाक सय्यद यांच्याकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात ही रक्कम स्वीकारण्यात आली होती. मिरजमधील वखारभाग परिसरातील पंचशील चौक येथील मोटोक्लब कार्यालयात संबंधित व्यवहार झाल्याची तक्रारीत नोंद आहे.
तक्रारदारांकडून पैसे स्वीकारल्यानंतरही गाड्या किंवा सोने न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अबरार अल्ताफ शेख व अकीब अल्ताफ शेख यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलिसांकडून सुरू आहे.



