नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: मोक्का गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद, २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी हितेश शेठाने

मेहकर (बुलढाणा): मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने मेहकर बायपास परिसरात एका संशयास्पद वाहनावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार गजाआड

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अमोल परट्या भोसले हा मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

मेहकर बायपास परिसरातून एक संशयास्पद वाहन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, मेहकर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बुलढाणा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:58 am, September 5, 2026
31°C
छितरे हुए बादल
49 %
23 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 28%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!