नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई : 1.31 लाखांच्या बनावट नोटा जप्त, दोघे ताब्यात

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी बनावट चलन प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल ₹1,31,000 किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या बनावट नोटांचा साठा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात बनावट नोटांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपींना पकडले. तपासादरम्यान आरोपींकडून ₹1.31 लाखांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.
या प्रकरणी आरोपी राहुल प्रकाश खिरूगाडे (वय 33 रा. नाना पाटील नगर ,ता. करवीर ,कोल्हापूर ) गुरू राजेंद्र मेंगाणे (वय 23 रा. गजबरवाडी ता.निपाणी जि. बेळगांव कर्नाटक ) यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 178, 179, 180 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके , पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे व पोलीस अंमलदार पथकाने कौशल्याने पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!