नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

१० हजारांची लाच प्रकरणी तलाठ्याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे

कोल्हापूर :- जमिनीच्या फेरफार नोंदीतील दुरुस्ती करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ४ हजार रुपये स्विकारणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. हनुमंत शंकर बडदे (वय ५५ वर्ष) असे या लोकसेवकाचे नाव असून तो सातवे सजा येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत आहे.तक्रारदाराने पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे विक्री केलेल्या प्लॉटचे क्षेत्रफळ खरेदी दस्तापेक्षा जास्त नोंदवले गेले होते. या चुकीच्या फेरफार नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी तलाठी हनुमंत बडदे याने १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केलीहोती.तडजोडीअंती बडदे याने ४,००० रुपये लाच म्हणून स्विकारण्याचे मान्य केले होते. या संदर्भात तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.तक्रारीची पडताळणी केली असता, बडदे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याने तक्रारदाराकडून ४,००० रुपये लाचेची रक्कम स्विकारली आणि उर्वरित ६,००० रुपयांची मागणी केली. याप्रकरणी कोल्हापूरच्या एसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. सध्या या आरोपीविरुद्ध कोल्हापूरमधील कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:33 am, September 21, 2026
28°C
साफ आकाश
71 %
4 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!