नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जिल्हा परिषदेच्या महिला अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात जिल्हा परिषदेत पन्नास हजारांची लाच घेताना पकडले

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी शांतारामभाऊ दुनबळे

नाशिक-: नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात

‘एसीबी’ने मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता संशयित वैशाली ठाकरे यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच आज बुधवारी १८ मार्च रोजीअटक केली. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील त्यांच्याच दालनात ही कारवाई करण्यात आली आहे.
एका बंधाऱ्याच्या कामाच्या वीस लाखांच्या देयकासाठी वैशाली ठाकरे यांनी संबंधित ठेकेदाराकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. हा व्यवहार अखेर पन्नास हजारांत ठरला. लाचेच्या रकमेशिवाय काम मार्गी लागत नसल्याने तक्रारदार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी १८ मार्च सायंकाळी सापळा रचला. सायंकाळी ५ च्या सुमारास ठाकरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली त्याचक्षणी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
अभियंता वैशाली ठाकरे त्यांच्या उद्धट वर्तणुकीसाठीही त्या जिल्हा परिषदेत प्रसिद्ध होत्या, अशी चर्चा सुरू असून कामाच्या निमित्ताने येणाऱ्या ठेकेदारांशी आणि अभ्यागतांशी त्या अत्यंत निंदनीय भाषेत संवाद साधत असत. त्यांच्या या वर्तणुकीमुळे ठेकेदारांमध्ये आधीच असंतोष होता. या कारवाईनंतर जिल्हा परिषदेतील ‘खाबुगिरी’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:59 am, June 9, 2026
30°C
साफ आकाश
58 %
24 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!