नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पतीकडून पत्नीचा शेतात खून; पिंपळनेर पोलिसांकडून अवघ्या २ तासांत आरोपीला अटक.

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
पिंपळनेर प्रतिनिधी साकीब सय्यद

पिंपळनेर: साक्री तालुक्यातील वाकी गावाच्या शिवारात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या प्रकरणाचा तपास करत पिंपळनेर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या दोन तासांत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी वाकी गावच्या शिवारातील एका शेतात महिला मृतावस्थेत पडून असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय नामदेव सहारे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली असता, तिचे नाव सुनंदा गोटु चौधरी (वय ४०, रा. वाकी, ता. साक्री) असल्याचे निष्पन्न झाले.कौटुंबिक वादातून हत्यापोलिसांनी केलेल्या अधिक तपासात समोर आले की, ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास शेतीच्या कारणावरून सुनंदा चौधरी आणि त्यांचे पती गोटु गन्साराम चौधरी (वय ४६) यांच्यात वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी गोटु चौधरी याने पत्नी सुनंदा यांच्या कपाळावर आणि डोक्यावर मोठा दगड घालून त्यांना जागीच ठार केले आणि तो फरार झाला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:54 am, August 17, 2026
27°C
घनघोर बादल
70 %
16 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!