नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का,डिजिटल सहीद्वारे सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न उघड.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – आनंद कांबळे (भामटे- कोल्हापूर)

जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा कथित गैरवापर करून सरकारी मालकीची जमीन खासगी व्यक्तींच्या नावे करण्यासाठी बनावट आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार चंदगडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी तातोबा भिकाजी गावडा (रा. मुगळी, ता. चंदगड) याच्याविरुद्ध चंदगड प्रभारी नायब तहसीलदार शशिकांत बापुसाहेब किल्लेदार यांनी महाराष्ट्र शासनातर्फे फिर्याद दिली असून चंदगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२)(३), ३४०(१)(२) आणि ३४१(२)(३)(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदगड मळवीवाडी येथील गट क्रमांक २३० ही जमीन सरकारी मालकीची असून ती वर्ग-२ ची जमीन असल्याचे माहित असतानाही आरोपीने अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा कथित वापर केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का वापरून जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरित केल्याचे भासविणारा बनावट आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.
हा बनावट आदेश तहसीलदार कार्यालय, चंदगड येथे सादर करून ग्राममहसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडून फेरफार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या माध्यमातून सरकारी जमिनीचा परस्पर व्यवहार करून ती खासगी व्यक्तींच्या नावे करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. सदर जमीन विलास गणपती पाटील, अरुण गणपती पाटील, नारायण गणपती पाटील आणि परशराम गणपती पाटील (सर्व रा. तुडये, ता. चंदगड) यांच्या नावे करण्यासाठी बनावट आदेशाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत म्हटले आहे.
२८ नोव्हेंबर २०२५ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तहसीलदार कार्यालय, चंदगड तसेच ग्राममहसूल कार्यालय, तुर्केवाडी येथे वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.०५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सरकारी
जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफाराचा संशय सरकारी जमिनीबाबत बनावट आदेश, खोटी डिजिटल स्वाक्षरी आणि बनावट शिक्क्याचा वापर झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची व्याप्ती तपासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संबंधित कागदपत्रे, डिजिटल स्वाक्षरीचा वापर, बनावट शिक्का तसेच फेरफार प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन खासगी व्यक्तींच्या नावे करण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपामुळे चंदगड महसूल विभागातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:48 am, August 17, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
8 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!