🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड
महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर चंदगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आणि वॅगनआर कार असा एकूण १ लाख ७३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास पाटणे फाटा ते तिलारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पतवदेव मंदिरासमोर, हलकर्णी एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी किरण शिवाजी मोरे (रा. रवळनाथ गल्ली, हलकर्णी, ता. चंदगड) हा संशयित गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत GOLDEN ACE ब्ल्यू फाईन व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २७६ सीलबंद बाटल्या, ज्यांची किंमत १३ हजार ८०० रुपये आहे, तसेच ७५० मिलीच्या ७९ बाटल्या, किंमत १९ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आल्या.याशिवाय RESERVE 7 RARE WHISKYच्या ७५० मिलीच्या ६ सीलबंद बाटल्या, किंमत ४ हजार ५०० रुपये, असा दारूसाठा पोलिसांच्या हाती लागला.दारूसाठ्यासाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची वॅगनआर कार
(क्रमांकMH-02-PA-3631) देखील पोलिसांनी जप्त केली असून तिची जुनी बाजारातील किंमत १ लाख ३५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.एकूण १ लाख ७३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल दारूच्या साठ्यासह वाहन असा एकूण १,७३,०५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने तसेच दारू परवाना नसताना गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा आरोप संशयितावर ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी विशाल संभाजी आंबोळे, पोलीस कॉन्स्टेबल ब. नं. २३०७, नेमणूक गडहिंग्लज पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), ६५ (ई), ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल १३४९ पाटील करीत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही म. पो. हे. कॉ. २०७९ चौगुले यांनी केली.



