🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज : अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात १६ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मिरज शहर परिसरात घडली. मालगाव रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर नॅनो कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ तिप्पन्ना कुसनगोड हा १६ वर्षीय मुलगा दुचाकी घेऊन मालगाव रोडने जात असताना श्रीहरी परमेश्वर निकेतन परिसरातील कलावती माता मंदिराजवळ एका नॅनो कारला पाठीमागून धडकला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.गंभीर जखमी झालेल्या मंजुनाथ याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, मुलगा अल्पवयीन आणि वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला दुचाकी चालविण्यास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याचे वडील तिप्पन्ना हळ्ळप्पा कुसनगोड (वय ४१) यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत असून, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देताना पालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



