नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळीत दिव्यांगाना ग्रामपंचायतीच्या वतीने घागरी वाटप.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी अकिल शहा

साक्री: दि.१७ ऑगस्ट सोमवारी रोजी शेवाळी(दा.) ता.साक्री येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना नुकताच तांब्याच्या घागरी वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सर्वांचे उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा आहे. त्याला अनुसरून शेवाळी (दा.) ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्नातील ५% निधी दिव्यांगांसाठी तांब्याच्या घागरी वाटपाचा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालयात राबविला.
यात एकूण २५ दिव्यांगाना लाभ देण्यात आल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी मनोहर सोनवणे यांनी दिली.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी शेवाळी(दा.) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मनोहर सोनवणे,सरपंच मंगल ताई भदाणे,उपसरपंच पंढरीनाथ साळुंके व इतर सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:33 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!