नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गोवा आणि मध्य प्रदेशातून होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्काचा सर्जिकल स्ट्राईक; २३.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी देवराव मराठे 

शहादा : गोवा व मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्यतस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील खेडदिगर सीमा तपासणी नाक्यावर १७ व १८ ऑगस्ट रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत परराज्यातील दारूचा साठा आणि दोन चारचाकी वाहनांसह एकूण २३ लाख ६५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईचे मुख्य मुद्दे:

जप्त मद्यसाठा: गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले ७३५ बल्क लिटर (८५ खोके) मद्य आणि मध्य प्रदेशातील १८० बल्क लिटर (१५ खोके) बिअर.

जप्त वाहने: दारूची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली २ चारचाकी वाहने.

एकूण मुद्देमाल: ₹२३,६५,३२०/-

कारवाईचे ठिकाण: सीमा तपासणी नाका, खेडदिगर (ता. शहादा, जि. नंदुरबार).

गुन्हे दाखल: आरोपींविरुद्ध खेडदिगर राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात २ स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त उषा वर्मा आणि अधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेश सकपाळ, दुय्यम निरीक्षक एच. पी. घरटे, अ. शां. गायकवाड आणि जवान ए. डी. पाटील, हितेश जेठे, मानसिंग पाडवी, ए. एन. अहिराव, एस. सी. बैसाणे, कपिल ठाकूर, एस. आर. चौधरी, आर. डी. साळवे, हर्षल पाटील व राजेश बागले यांच्या पथकाने पार पाडली.

नागरिकांनी अवैध मद्यनिर्मिती किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:33 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!